भारत जगातील नंबर वन तांदूळ निर्यातदार

यंदाच्या वर्षी थायलंडला मागे सारून प्रथमच भारताने जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार देश बनण्याचा मान मिळविला असून २०१२ सालात भारताने तब्बल ९५ लाख ५० हजार टन तांदूळ निर्यात केला असल्याचे यूएसडीएच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार देश म्हणून थायलंडने अनेक वर्षे पहिला क्रमांक जपला होता. गतवर्षीही थायलंडने १०६ लाख टन तांदूळ निर्यात केला होता मात्र यंदा त्यांना केवळ ६५ लाख टन तांदूळ निर्यात करणे शक्य झाले आहे. थायलंडची तांदूळ निर्यात घटली असतानाच भारताची तांदूळ निर्यात सुमारे १८ लाख टनांनी वाढली असल्याचे या अहवालात म्हणण्यात आले आहे.

तांदूळ निर्यातीत भारतानंतर व्हिएतनाम ७० लाख टन, थायलंड ६५ लाख टन, पाकिस्तान ३८ लाख टन तर यूएस ३५ लाख टन यांचे नंबर आहेत. गतवर्षी तांदूळ निर्यातीत भारत तिसर्यात स्थानावर होता. २०१२ सालात ४६४.८७ दशलक्ष टन तांदळाचे जागतिक उत्पादन अपेक्षित असून भारतच सर्वात मोठा तांदूळ उत्पादन  देश ठरला आहे.