डर्टी सारख्या संवेदनशील सिनेमात काम करून विद्या बालनने बॉलीवूडमध्ये खूपच लोकप्रियता मिळवली आहे. मात्र आगमी काळात येत असलेल्या तिच्या ‘घनचक्कर’ या कॉमेडी सिनेमात काम करण्यासाठी ती अजूनही घाबरत आहे. डायरेक्टर राजकुमार अग्रवाल यांच्या कॉमेडी आणि थ्रिलर असलेल्या ‘घनचक्कर’ या सिनेमात विद्या बालन सोबत इम्रान हाश्मी काम करणार आहे.
कॉमेडीला घाबरते विद्या
याबाबत बोलताना विद्या म्हणाली, ‘माझा हा पहिलाच कॉमेडी सिनेमा असल्याने मी थोडीसी नर्वस आहे. मला अजूनपण काळजी आहे की, मी या सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांना हसवू शकणार की नाही,याबाबत शंका वाटत आहे. सध्या शूट सुरु असून त्यासाठी मी सध्या खूप मेहनत घेत आहे. डर्टी सिनेमाच्या यशामुळे मला आता मध्यमवर्गीय प्रेक्षक सूद्धा पसंत करीत असल्याने मी सध्या खूप खुश आहे’.
प्रेक्षकांना गेल्या काही दिवसापासून सामजिक विषयावर आधारित सिनेमा आवडत असल्याने आगामी काळात अशास्वरुपाचा अश्या असलेल्या सिनेमात आगमी काळात काम करण्यास आवडेल असे ही यावेळी प्रसारमाध्यामाशी बोलताना विद्याने स्पष्ट केले.
