जॉन सोबत आयटम सॉंग करण्यास प्रियांकाचा नकार

गेल्या काही दिवसापासून प्रियांका चोप्रा जॉन अब्राहम सोबतच्या ‘शूटआउट एट वाडला’ या सिनेमात आयटम सॉंग करणार अशी अफवा पसरली होती. मात्र या सर्वच अफवांना फुल स्टॉप देत प्रियंकाने जॉन सोबत आयटम सॉंग करण्यास नकार दर्शविला आहे. आतापर्यंत प्रसिद्ध झालेली सर्व चर्चा ही खोटी असल्याचे तिने स्पष्ट केले.

प्रियंका म्हणाली, ‘ मी स्वतचा सिनेमा सोडून अन्य सिनेमात काम करणार नाही. काही जन मी ‘शूटआउट एट वाडला’ या सिनेमात जॉन सोबत आयटम सॉंग करणार अशी अफवा पसरवली होती. मात्र मी कुठलायचं सिनेमात आयटम सॉंग करणार नसल्याचे तिने स्पष्ट केले. सध्या मी एकता कपूर सोबत ‘मिलन टॉकीज’ या सिनेमात काम करीत असून, या सिनेमाच्या कामात सध्या बीजी आहे.’

प्रियांकाचा डायरेक्टर असलेल्या प्रियांका चोप्रा सोबत पहिला सिनेमा असून त्यामुळे सध्या खूप उत्साहित असल्याचे समजते. तिचा ऋतिक रोशन सोबतच्या ‘कृष’ सिनेमाचे शूट पूर्ण झाले असून त्यानंतर तिच्याकडे ‘जंजीर’ हा सिनेमाचा लवकरच रिमेक येत असून त्याचे काम लवकरच हाती ती घेणार आहे. ‘मिलन टॉकीज’ या सिनेमासाठी जादा वेळ कसा काढता येतो यावर सध्या तिने लक्ष केंद्रित केले आहे.