सोहा अली खान सध्या तिच्या नवीन भाभी असलेल्या करीना कपूर सोबत जास्तीत जास्त वेळ घालवत आहे. सोहाचा भाऊ सैफ अली खानने करीना कपूर सोबत १६ ऑक्टोबर रोजी लग्न केले आहे. करीनाच्या लग्नाला दोन आठवडे झाले असून तिच्या सोबतच माझा जास्तीत जास्त वेळ जात असल्याची कबुली सोहाने दिली.
सोहा खुश आहे करीना सोबत
सोहा अली खानच्या हस्ते नुकत्याच एका फैशन संग्राहालायचे उध्दघाटन करण्यात आले. यावेळी प्रसारमाध्यमाशी बोलताना सोहा म्हणाली, ‘ करीनाचा स्वभाव खूपच चांगला आहे. मी तिच्यसोबत आता दोन आठवडे घालवेले आहेत. त्यामुळे मी तिला पूर्णपणे ओळखत असून आम्ही लग्नाच्या वेळी खूप मजा केली. एकंदरीत तिच्या आमच्या घरी येण्याने सध्या सर्वत्र आनंदी आनंद वातावरण आहे.’
आता तुझे लग्न कधी करणार या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सोहा म्हणाली,’ माझी मोठी बहिण सबा हिचे लग्न झालेले नाही, तिचे पहिल्यांदा लग्न होईल.’ गेल्या काही दिवसापासून सोहा व अभिनेता कुमाल खेनु सोबत लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा होती. सध्या सोहाने ‘मिडनाइट्स चिल्ड्रेन’ या सिनेमाच्या प्रेमोवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याशिवाय तिच्या आगमी काळात येत असलेल्या ‘साहिब बीवी और गैंगस्टर 2’, ‘चार फुटिया छोकरे’ आणि ‘एयरपोर्ट’ या सिनेमाच्या शूटमध्ये ती व्यस्त आहे.
