गेल्या काही दिवसापासून ऐश्वर्या रॉय लवकरच बॉलीवूडमध्ये पुनरागमन करणार याची चर्चा जोरात रंगली आहे. काही दिवसापुर्वी ती मणीरत्नमच्या सिनेमातून एन्ट्री करणार आहे अशा अफवा पसरल्या असतानाच आता ती करणा जोहरच्या सिनेमातून एन्ट्री करणार असल्याचे समजते.
ऐश करणार करणच्या सिनेमातून एन्ट्री
पुढच्या महिन्यात ऐश्वर्याची मुलगी एक वर्षाची होणार आहे. त्यामुळे तिने पुन्हा बॉलीवूडमध्ये एन्ट्री करण्याचे ठरविले आहे. आगामी काळात १९८२ साली ऋषिकेश मुखर्जीच्या हिट सिनेमा असलेल्या ‘बेमिसाल’वर आधारित रिमेक तयार करण्यचा विचार सध्या डायरेक्टर करण जोहर करीत आहे. या सिनेमाच्या रिमेक मध्ये ऐश्वर्या रॉयने काम करावे अशी करणची इच्छा आहे. हा सिनेमा वफादारी, त्याग आणि इंतीकाम अशा तीन सिनेमावर आधारित आहे. हा सिनेमा करण स्वत डायरेक्टर करणार की नाही हे अजून ठरलेले नाही.
‘बेमिसाल’ या सिनेमात राखी शिवाय अमिताभ बच्चन आणि विनोद मेहरा हे दोघेपण सहभागी झाले होते. ज्यामध्ये राखीचा रोल दमदार होता. त्याच पद्धतीचा रोल या सिनेमात ऐश्वर्याचा राहणार आहे. यापूर्वी २०१० मध्ये ऐश्वर्याचा गुजारीश हा सिनेमा आला होता. त्यानंतर तिचा कोणताच सिनेमा आला नसल्याने या सिनेमाबाबत उत्सुकता लागली आहे.
