सिंगालीया पर्वतीय क्षेत्र

पर्वताच्या रांगा असल्या की पर्यटन करताना अधिक आनंद होतो. त्यामुळे अनेकांना पर्वत रांगा असलेल्या ठिकाणी सुट्टीच्या दिवसात पर्यटनासाठी जायला आवडते. हे लक्षात घेऊन  सिक्कीम सरकारने सिंगालीया पर्वत रांगांच्या विकासकामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी काळात याठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढणार आहे.
Sikkim
सिक्कीम पर्यटनातील अप्रतिम निसर्ग सौंदर्य सतत सर्वांना भुरळ घालणारे आहे. येथील हिरवाईने नटलेल्या डोंगर माथ्यातून मार्ग काढत प्रवास करणे सर्वांनाच आवडते. येथील सहल ही पर्यटकांना एक आनंदाची पर्वणीच असते.
Sikkim1
सिक्कीम येथील सिंगालीया पर्वतीय क्षेत्रात आता नव्याने विकास कामे सुरू झाली आहेत. येथील पश्‍चिम भागातील अटरे या गावापासून नेपाळपर्यंत पर्वत रांगामधून रस्ता काढण्यात आला आहे. येथून जात असताना दोन्ही बाजूने पसरलेल्या हिरवळीमुळे मन प्रफुल्लीत होते. ही हिरवळ केवळ पावसाळ्यातच पहायला मिळते असे नाही, तर उन्हाळ्याच्या सुट्टीतही या हिरवळीत काहीच फरक पडत नाही. त्यामुळे देशातील अनेक पर्यटक उन्हाळ्याची सुट्टी घालविण्यासाठी याठिकाणी येतात. सिक्कीम सोबतच नेपाळपर्यंतची टूर घेता येत असल्याने अनेक विदेशी पर्यटक याठिकाणी हजेरी लावतात.

Leave a Comment