टायगर सलमान खानच्या ‘वॉन्टेड’ या सिनेमाने २००९ साली सर्वत्र धमाल माजवली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा या सिनेमाचा रिमेक तयार करण्याचे डायरेक्टर बोनी कपूर व अभिनेता असलेल्या प्रभू देवाने ठरविले आहे. ‘वॉन्टेड 2’ तयार करण्यास त्यानी सध्या सुरुवात केली आहे. सलमान मात्र या सिनेमाच्या बाबतीत अजून तरी कॉन्शस असून, जर या सिनेमात ऑरिजनैलिटी असेल तरच काम करण्याचे त्याने सध्या तरी ठरविले आहे. त्यामुळे बोनी कपूर व प्रभू देवा यांनी स्क्रिप्ट तयार करण्यास सुरुवात केली असली तरी, त्यांनी पण ऑरिजनैलिटीवर भर दिला आहे.
याबाबत बोलताना डायरेक्टर बोनी कपूर म्हणाले, ‘ प्रॉजेक्टच्या बाबतीत जास्त चर्चा करणे सध्या उचित ठरणार नाही. मात्र सलमान खान हा माझा क्लोज़ फ्रेंड आहे. त्याच्या सोबत यापूर्वी मी दोन सिनेमात काम केले आहे. या पूर्वीच्या सिनेमात सलमान सोबत आयेशा टाकीया होती, मात्र या सिक्वेल मध्ये ती असणार की नाही, हे अजून ठरले नाही. मात्र सलमानच्या आदेशावरून या सिनेमात सर्व काही ओरीजनल असणार आहे.’
गेल्या काही दिवसापासून बरचसे त्यांनी रिमेक केले आहेत. त्यामुळे त्याला सिक्वेल सोडून नवीन काही तरी करन्याची इच्छा असल्याने आता ओरीजनल सिनेमा निर्माती करावी असा सल्ला त्यांनी दिला आहे. त्यामुळे आता आगामी काळात सलमान सोबत प्रेक्षकाना सुद्धा काही तरी ओरीजनल पाहवयास मिळणार हे मात्र निश्चित झाले आहे.