ड्रामेबाज़ी आवडत नाही – इम्रान हाश्मी

सध्या इम्रान हाश्मी जरी ‘रश’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असला तरी या निम्मिताने तो बोलण्याची संधी मात्र चुकवत नाही. तो सतत काही ना काही तरी बोलून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करीत असतो. ‘रश’ या सिनेमात इम्रान क्राइम रिपोटरचा रोल करत आहे. त्यामुळे तो सध्या मिडीयाच्या बाबतीत सुद्धा बोलयला शिकला आहे.

इम्रान म्हणाला , ‘ काही न्यूज चैनल केवळ सनसनी असलेल्या बातम्या देत असतात. खास करून गुन्ह्याच्या बाबतींत ड्रामेबाज़ी करत असलेल्या बातम्या हे चैनल प्रसारित करून टिआरपी वाढवण्यासाठी स्पर्धा करीत असतात. त्यामुळे अशा स्वरुपाच्च्या अर्ध्या बातम्या केवळ बकवास असतात. त्यामुळे अशा स्वरूपाच्या बातम्या न बघने हेच चांगले आहे.’

सध्या इम्रान हा ‘रश’ या सिनेमाच्या प्रमोशनच्या कामात व्यस्त आहे. या सिनेमाचे डायरेक्टर शमीम देसाई हे होते, मात्र या सिनेमाचे शूट सुरु असतना त्यांचे अचानक निधन झाले. त्यामुळे त्यांच्या पत्नी प्रिया देसाई यांनी या सिनेमाचे अर्धवट राहिलेले शूट पूर्ण केले आहे. आगामी आठवड्यात हा सिनेमा सर्वत्र रिलीज होणार आहे. या सिनेमात इम्रान सोबत अभिनेत्री नेहा धुपिया आणि सागरिका घाटगे या दोघीजनी झळकणार आहेत. त्याशिवाय इम्रानचा आगमी काळात ‘घनचक्कर’ हा सिनेमा येत असून या मध्ये त्याची नायिका म्हणून विद्या बालनने काम केले आहे. हा सिनेमा कॉमेडी आहे. यापूर्वीच इम्रान आणि विद्या या दोघाचा ‘द डर्टी पिकचर’ हा सिनेमा हिट झाला होता.