जॉन अब्राहम करणार प्रिया रुचल सोबत लग्न

काही दिवसापासून बॉलीवूडमध्ये लग्नाचा सिझन मात्र जोमाने सुरु झालेला दिसत आहे. सैफ अली खान व करीना कपूर यांनी लग्न केल्यानंतर लग्न करण्यची इंडस्ट्रीजमध्ये सध्या तर स्पर्धा लागलेली दिसत आहे. डिसेंबर २०१२ मध्ये म्हणजे आणखीन दोन महिन्यांनी बॉलीवुड मधील आणखीन एक हैंडसम हंक असणारा जॉन अब्राहम लग्न करणार आहे. येत्या काही दिवसातच जॉन इंवेस्टमेंट बैंकर प्रिया रुंचलसोबत लग्न करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार जॉनचे बिपाशा बसू सोबत ब्रेकअप झाल्यानतर त्याचे संबध इंवेस्टमेंट बैंकर असलेल्या प्रिया रुंचल सोबत जुळले होते. गेल्या काही दिवसापासून तो प्रिया रुंचल सोबत फिरताना दिसत होता. तिच्या सोबतच तो इंडस्ट्रीज मधील पार्ट्यांना हजेरी लावत होता. त्यामुळे या दोघाच्या अफेयेरची चर्चा बॉलीवूडमध्ये सुरु असतानाच त्यांनी लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. लग्नाच्या बाबतीत कधीपण जॉनकडे जर विचारना केली तर तो काहीच सांगत नसे, फक्त तो स्मित हास्य करत निघून जात होता.

मात्र नुकत्याच समजलेल्या बातमीनुसार जॉन लवकरच प्रिया सोबत लग्न करणार आहे. जॉन आणि बिपाशा बसू यांचे ब्रेकअप हे बिपाशाने लग्न करण्याची मागणी केल्याने झाले होते, असे समजते. त्यामुळे प्रिया सोबत लग्न करण्यास जॉन तयार होणार की नाही याचे उत्तर मात्र लवकरच मिळणार आहे.

Leave a Comment