अर्जुन रामपाल व प्रकाश झाचे बिनसले

सध्या अर्जुन रामपाल खूपच चिडला आहे. ‘चक्रव्युव’ या त्याच्या बहुचर्चित सिनेमात अभिनेत्री इशा गुप्ता सोबत त्याचे काही लव मेकिंग सीन शूट करण्यात आले होते. मात्र फायनल एडिटिंगच्या वेळी हे सीन डायरेक्टर प्रकाश झा यांनी वगळल्याने तो खूप चिडला आहे. या लव मेकिंग सीनची अर्जुन व इशा गुप्ता या जोडीने दोन दिवस रिहर्सल केली होती. मात्र ऐनवेळी या सीनला कात्री लावल्याने तो काहीसा नाराज झाला आहे.

अर्जुनने हे लव मेकिंग सीन कॉमफटेबल व्हावेत म्हणून इशा गुप्ता सोबत दोन तीन दिवस एकांतात घालविले होते. त्यामुळे या सर्व प्रकारची चर्चा सर्वत्र झाली होती. मात्र अचानक सिनेमातून हे सीन वगळण्यात आले आहेत. ज्यावेळी अर्जुनने ‘चक्रव्युव’ या सिनेमाची फर्स्ट प्रिंट पहिली, त्यावेळी त्याला हा सीन वगळल्याचे लक्षात आले. याची विचारणा त्याने प्रकाश झा यांच्याकडे केली. त्यावेळी प्रकाश झा म्हणाले, ‘ सुरुवातीच्या काळात सिनेमात असा प्रकारच्या सीनची जरुरत आहे असे वाटले. मात्र नंतर एडिटिंग करतेवेळी या सीनची गरज नसल्याचे लक्षात आल्याने ते सीन काढून टाकले असल्याचे स्पष्टीकरन दिले.’

अर्जुनच्या बाबतीत असा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे, असे नाही तर, यापूर्वी राजनीती या सिनेमाच्या वेळी त्याचे काही सीन कापण्यात आले होते. त्यावेळी अर्जुनने आरडाओरड केल्याने त्याचे सीन पुन्हा एडीट करण्यात आले होते. त्यामुळे पुढील काळात अर्जुनला हॉट सीन करताना ते सीन सिनेमात असणार की नाही याचा विचार करावा लागणार आहे.