गावसकरांना बीसीसीआयचा जीवनगौरव पुरस्कार

मुंबई,२६ ऑक्टोबर-भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्यावतीने देण्यात येणारा कर्नल सी.के.नायडू जीवनगौरवर पुरस्कार यंदा माजी कर्णधार सुनिल गावसकर यांना जाहीर झाला आहे.

बीसीसीआयच्या कर्नल सी.के.नायडू पुरस्कार समितीच्या गुरुवारी मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. स्मृतीचिन्ह, सम्मानपत्र आणि २५ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

लिटल मास्टर सुनिल गावसकर यांनी १२५ कसोटी सामन्यातून भारताचे प्रतिनिधित्व केले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पदार्पणातील मालिकेत त्यांनी विक्रमी ७७४ धावा केल्या होत्या. कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करणारे ते पहिले क्रिकेटपटू आहेत. सुनिल गावसकर यांच्या नेतृत्वाखालीच भारताने प्रथम क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरले होते.

गावसकर सध्या बीसीसीआयच्या तांत्रिक समिती आणि आसीसीच्या क्रिकेट समितीचे अध्यक्षपदावर आहेत.
गावसकर यांच्यासह बीसीसीआयने क्रिकेटमधील योगदानासाठी अन्य काही क्रिकेपटूंना विशेष पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये विजय मर्चट, दिलीप सरदेसाई, विजय मांजरेकर, आदी क्रिकेटपटूचा समावेश आहे.

Leave a Comment