सॅमसंग गॅलेक्सी मिनी लाँच

कोरियातील बलाढ्य सॅमसंग इलेक्ट्रोनिक्स कंपनीने त्यांच्या बहुचर्चित गॅलेक्सी एस थ्री स्मार्ट फोनची मिनी आवृत्ती गॅलॅक्सी एस थ्री मिनी या नावानेच लाँच केली आहे. फ्लॅगशीप गॅलेक्सी एस थ्रीचे हे कॉम्पॅक्ट व्हर्जन आहे. ओरिजिनल गॅलॅक्सी एस थ्री पेक्षा हा स्मार्टफोन थोडा स्वस्त असेल असा अंदाज वर्तविला जात असला तरी कंपनीने अजून त्याची किंमत जाहीर केलेली नाही.

गॅलॅक्सी एस थ्रीपेक्षा या मिनीमधील कांही फिचर्स वेगळी असून याचा स्क्रीन ४ इंचाचा आहे. अँडाॅइड जेली बीनसह असलेल्या या फोनचा प्रोसेसर ड्युअल कोअरचा आहे. मूळ फोनमधील ८ मेगापिक्सल ऐवजी या मिनीतील कॅमेरा ५ मेगापिक्सलचा आहे. आठ आणि सोळा जीबी अशा दोन व्हर्जनमध्ये हा मिनी उपलब्ध असून त्यात ब्लू टूथ सुविधा देण्यात आलेली आहे.

हा फोन भारतात कधी लाँच होणार आणि त्याची भारतातील किंमत काय असेल याविषयी कंपनीने अजून काहीही माहिती जाहीर केलेली नाही.