मेक्सिको जगातील सर्वात धोकादायक देश

जगातील सर्वात धोकादायक देश म्हणून मेक्सिकोचा पहिला नंबर असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे. न्यू यॉर्क डेलीने हे वृत्त दिले आहे.

जगात जी दहा शहरे ग्लोबल मर्डर कॅपिटल्स म्हणजे जागतिक खुनांच्या राजधान्या म्हणून ओळखली जातात त्यात पाच शहरे मेक्सिकोतील आहेत. मेक्सिक ोतील सॅन पेट्रो हा जगातील सर्वाधिक व्हायोलंट नागरी भाग असून येथे गतवर्षात ११४३ जणांचे खून पडले आहेत. या भागाची लोकसंख्या आहे सात लाख.

जगातील पन्नास धोकादायक शहरांची जी यादी या सर्वेक्षणातून तयार करण्यात आली आहे त्यातील ४० शहरे लॅटिन अमेरिकेतील असून त्यात ब्राझीलमधील १४ तर मेक्सिकोमधील १२ शहरांचा समावेश आहे. सर्वाधिक व्हायोलंट सिटी यादीत अमेरिकेतील न्यू ऑरलिन्स या शहराचा २१ वा क्रमांक आहे असेही या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

 

Leave a Comment