बनावट नोटा राकेटचा पर्दाफाश

मुंबई दि.१२ – मुंबईतील वरळी पोलिस स्टेशनच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने आंतरराष्ट्रीय बनावट नोटा रॅकेटचा पर्दाफाश केला असून तीन जणांना अटक केली आहे. माहिम जवळ सुमारे साडेतीन लाखांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

अटक करण्यात आलेल्या तिघांकडून पोलिसांनी बरीच माहिती मिळविली असून डिसेंबरमध्ये गुजराथेत होत असलेल्या विधानसभा निवडणूकांत प्रचंड मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा चलनात आणल्या जाणार असल्याची माहितीही मिळाली आहे. गुजराथेत बनावट नोटांची टंचाई निर्माण झाल्याने बांग्लादेशांतून आणण्यात आलेल्या नोटा मुंबईमार्गे गुजराथेत पाठविण्यात येणार असल्याचेही चौकशीत उघड झाले आहे.

बनावट नोटा प्रकरणात एका आठवड्यात झालेली ही दुसरी अटक असून यापूर्वी जामनगर येथे मुंबईतील माटुंगा येथील एक व्यावसायिक धीरजमल मणीलाल याला बनावट नोटा खरेदी केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती.

 

Leave a Comment