इंडस्ट्रीजमध्ये काम करीत असताना कशाचे ना कशाचे तर प्रेशर असतेच. त्यामुळे नेहमीच अशा स्वरूपाच्या कोणत्या ना कोणत्या तरी प्रेशर खाली काम करावे लागते. दिग्दर्शक करण जोहरच्या ‘स्टुडट ऑफ द् ईयर’ या सिनेमातून पाहिल्यादा एन्ट्री करणाऱ्या दिग्दर्शक डेविड धवनचा मुलगा वरून धवनवर मात्र सध्या सरनेमचे प्रेशर आहे.
वरून धवनच्या मते, ‘सिनेमाक्षेत्राशी निगडीत असलेल्या कौटुंबतील व्यक्तीला सर्व काही सहज मिळते असे म्हटले जाते. मात्र सिनेमात काम करताना त्याच्यावर सरनेमचे मोठे प्रेशर असते. हे प्रेशर कमी करून सिनेमात काम करण्याचे चॉलेंज त्याला स्वीकारावे लागते. मी शुटच्या कामात व्यस्त असतना देखील मला डॅडी ( डेविड धवन) यांचे सतत मेसेज येत असतात. चूक करू नकोस, कामावर लक्ष केंद्रित कर, कामाशी निष्ठा ठेव असा सल्ला ते नेहमीच देत असतात.’
सिनेमा क्षेत्राशी निगडीत असल्याने माझ्या सर्वासोबत ओळखी आहेत. मी ज्यावेळी कोणाची भेट घेतो त्यावेळी केवळ ऑफिसमध्ये गेल्यानंतर कॉफी पिण्याच्यापुढे कोणच काहीही विचारत नाही. त्यामुळे स्वताला सिद्ध करण्यासाठी आपली प्रतिभा दाखवावी लागते. त्यावेळी खऱ्याअर्थाने यशस्वी होता येते, असेही वरून म्हणाला.