‘राजनीती-२’ मध्येही झळकणार कैटरीना

दिग्दर्शक प्रकाश झा येत्या काळात राजनीती या सिनेमाचा सिक़्वेल तयार करणार आहेत. या राजनीतीच्या दुसऱ्या भागात कैटरीना कैफ ही पोलिटीकल महिलेची प्रमुख भूमिका साकारणार आहे. ज्यामध्ये ती स्वताच्या हिमतीवर विशाल साम्रज्य स्थापन करते असे दाखविण्यात आले आहे.

यावेळेस कैटरीनाचा या सिनेमात लीडिंग रोल असणार आहे. कैटरीनाला तिच्या कारकीर्दीत पहिल्यादा या सिनेमामुळे हिरो होण्याची संधी मिळणार असल्याने सध्या ती खूप खूष आहे. सध्या कैटरीना दिग्दर्शक प्रकाश झा सोबत ‘सत्संग’ या सिनेमात काम करीत असून या सिनेमाचा नायक म्हणून तिच्या सोबत अक्षयकुमार काम करीत आहे. प्रकाश झा यांना ‘राजनीती-२’ मध्ये पुन्हा एकदा कैटरीना-रणबीरची जोडी हवी होती. मात्र रणबीर कपूरने राजनीती पासुन दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

रणबीरच्या मते त्याला एका दिग्दर्शकासोबत दुसऱ्यांदा काम करण्यात इंटरेस्ट वाटत नसल्याने त्याने या सिनेमात काम करणे टाळले आहे. प्रकाश झा व कैटरीनासाठी हा सिनेमा एक आव्हान असणार आहे. या सिनेमात बाकी कलाकार नवीन असणार असल्याने या दोघानाच सर्व बाजू संभालावी लागणार आहे. त्यामुळे त्यांचा आगामी काळात कस लागणार आहे.

Leave a Comment