अमिरचा ‘तलाश’ आरुषी मर्डरवर आधरित

बॉलीवूडमधील निर्मात्याच लक्ष सदैव सत्य घटनावर आधारित सिनेमा निर्मिती करण्यावर असते. त्यामुळेच एखादी घटना घडली की, लगेचच निर्माता मंडळी त्या घटनेवर आधारित सिनेमा तयार करण्यावर लक्ष केंद्रित करतात. अमीर खानचा आगामी काळात येत असलेला ‘तलाश’ हा सिनेमा नोएडा येथील बहुचर्चित आरुषी-हेमराज हत्याकाडावर आधारित आहे. दिग्दर्शक रिमा कागजीच्या या सिनेमात अमीर सोबत करीना कपूर व राणी मुखर्जी प्रमुख भूमिका करीत आहेत.

सुत्रांने दिलेल्या माहितीनुसार रिमा व आमिरने आरुषी केस संदर्भातील उत्तरप्रदेश पोलीस व सीबीआयच्या अहवालाचा पूर्णपणे अभ्यास करून या सिनेमाची निर्मिती केली आहे. १६ मे २००८ मध्ये १४ वर्षीय आरुषी ही तिच्या नोएडा येथील घरी मृतअवस्थेत आढळली होती. तर त्यानंतर तिच्या घरातील नोकर हेमराज याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी घरीच आढळून आला होता. आरुषीचे वडील राजेश तलवार व आई नुपूर तलवार यांनी या दोघाची हत्या केली असल्याचा आरोप असून सध्या दोघेही अटकेत आहेत.

या सिनेमातून काही नवीन घटनाक्रमावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सिनेमाची निर्मिती फरहान अख्तर व अमीर खान या दोघांनी मिळून केली आहे. सध्या या सिनेमाचे शूट फायनल स्टेजला आहे. येत्या ३० नोव्हेंबर रोजी हा सिनेमा सर्वत्र रिलीज होणार आहे.

Leave a Comment