अभिनेत्री मनीषा कोईरालाने सध्या प्रोडक्शन व दिग्दर्शन क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. तिने सध्या मुंबईमध्ये मुक्काम करण्याचे ठरविले असून ‘एमके मुविंग इमेज’ च्या माध्यमातुन काम करणे सुरु केले आहे. त्यासोबतच तिने तिचे लग्न तुटल्याचे सांगत आयुष्यातील काही गुपित उघडे करण्याचा प्रयत्न केला.
मनीषाने राम गोपाल वर्मा सारखे प्रोडक्शन हाउस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये वितरण व फायनान्स सारखे कम्प्लीट इन्फ्रास्ट्रक्चर असणार आहे. मनीषने अमेरिकेमध्ये जाऊन काही दिवसापूर्वीच फिल्म मेकिंगचा कोर्स केला आहे. त्याचा तिला आगामी काळात फायदा होणार आहे.
मनिष म्हणाली, ‘ काही जनाची लग्न सफल होतात. तर काही जणाची असफल होत असतात. सध्या मी पतीपासून विभक्त आहे. तरी पण त्याच्या कुटुंबबियावर माझा अजूनही खूप विश्वास आहे. मी मसाला सिनेमा तयार करू शकत नाही. त्यामुळेच मी दिग्दर्शनच्या बाबतीत थोडीसी नर्वस आहे. त्यासाठी मला आगामी काळात खूप प्रयत्न करावे लागणार आहेत.’