दुबईत साकारतोय ताज अरेबिया

दुबई दि.४ – जगातील सात आश्चर्यात गणना होत असलेल्या भारतातील आग्रा येथील ताजमहाल दुबईतही ताज अरेबिया या नावाने साकारला जात आहे. अमरप्रेमाचे प्रतीक मानला गेलेला भारतातील ताजमहाल शहाजहान बादशहाने त्याची प्रिय पत्नी मुमताज हिच्या स्मरणार्थ बांधला होता. अर्थात तो मकबरा आहे. म्हणजे मुमताजबेगमला शेवटची विश्रांती तेथे दिली गेली आहे. दुबईतील ताज अरेबियाही प्रेमाचेच प्रतीक आहे मात्र थोडे वेगळ्या अर्थाने

याविषयी मल्टी पर्पज डेव्हलपमेंट फाल्कन सिटी ऑफ वंडर्स या खासगी कंपनीचे अध्यक्ष सलीम अल मूसा सांगतात की आग््रयाच्या ताजमहाल पेक्षाही ही वास्तू अधिक भव्य आहे. येथे नवदांपत्यांसाठी भव्य शॉपिग मॉल्स तसेच अपार्टमेंट असणार आहेत. मुघल शैलीच्या बागबगिच्यांनी ही वास्तू वेढलेली असून ती बॉलिवूडला शूटिगसाठीही देण्यात येणार आहे.२०१४ साली या वास्तूचे बांधकाम पूर्ण होऊन ती वापरासाठी तयार असेल असेही त्यांचे म्हणणे आहे.

 

Leave a Comment