दिग्दर्शक महेश भट्टची मुलगी आलिया भट्ट सध्या भलतीच फॉर्ममध्ये दिसत आहे. काही दिवसापूर्वीच आलियाने दिग्दर्शक करण जोहरच्या सिनेमातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली आहे. अजून तिचा हा सिनेमा रिलीज झालेला नाही. त्यातच आता करनने आगामी काळात येणाऱ्या त्याच्या सिनेमासाठी आलियाला साईन केले आहे.
करनच्या आगामी काळात येत असलेल्या ‘२ स्टेट्स’ या सिनेमामध्ये लीड रोल अलियाच करणार आहे. चेतन भगतच्या एका नॉवलवर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमाचे निर्माते म्हणून साजिद नाडियाडवाला काम करीत आहेत, तर या सिनेमात आलियाच्या ऑपजीट अर्जुन कपूर काम करनार आहे.
करनने जरी आलियाला या सिनेमासाठी साईन केले असले तरी त्याची घोषणा तो आताच करणार नसल्याचे समजते. येत्या काळात आलीयाचा ‘स्टुडट ऑफ द् एयर’ हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाला प्रेक्षकाचा रिस्पान्स कसा मिळणार याची वाट सध्या तो पाहत आहे. त्यानंतर या सिनेमाची तो घोषणा करणार असल्याची माहिती सूत्राने दिली.