नवी मारुती अल्टो बुक करा ५ हजारात

नवी दिल्ली: ‘मारुती’चे सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन असलेली ‘अल्टो ८००’ ही कार आता नव्या स्वरूपात बाजारपेठेत उपलब्ध होत असून केवळ ५ हजार रुपये भरून तिचे बिकिंग करता येणार आहे.

कार उत्पादकांमध्ये असलेल्या मोठ्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी मारुतीने अल्टोमध्ये अनेक सुधारणा करण्याबरोबरच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फेस्टिवल ऑफर जाहीर केली आहे. नव्या अल्टोचे दि.१६ ऑक्टोबर रोजी बाजारपेठेत पदार्पण होणार असले तरी त्याचे बुकिंग सुरू करण्यात आले आहे. ग्राहकांना केवळ ५ हजार रुपये भरून ऑनलाईन बुकिंग करता येते.

नवी अल्टो सीएनजी आणि पेट्रोलच्या प्रत्येकी ३ प्रकारात उपलब्ध आहे. पेट्रोल कार २३ किलोमीटर प्रतिलिटर तर सीएनजी ३१ किलोमीटर प्रतिकिलो प्रवास करेल; असा कंपनीचा दावा आहे. अल्टोच्या जुन्या गाड्यांपेक्षा या कारमध्ये अधिक जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सहा रंगात उपलब्ध असणार्‍या या कारमध्ये सुरक्षिततेसाठी एअर बॅग्ज उपलब्ध आहेत.