अखेर अण्णा आणि केजरीवाल यांचा काडीमोड

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजसेवक आणि एकेकाळच्या टीम अण्णाचे खंदे समर्थक अरविंद केजरीवाल यांच्यात राजकीय पक्षाच्या स्थापनेवरून अखेर काडीमोड करण्यावर शिक्का मोर्तब झाले. अण्णांनी अराजकीय आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचे जाहीर केले; तर केजरीवाल यांनी पक्षस्थापनेची घोषणा केली.

दिल्ली येथे बुधवारी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे सदस्य, अन्नाचे समर्थक आणि हितचिंतक यांची बैठक पार पडली. या बैठकीत जनतेला राजकीय पर्याय देणे अनिवार्य असल्याचे म्हणणे केजरीवाल यांनी लाऊन धरले; तर अण्णांनी राजकारणाच्या निरर्थकतेचा मुद्दा सोडला नाही. अण्णा समर्थक किरण बेदी आणि संतोष हेगडे यांनीही पक्ष स्थापनेला विरोध केला.

अशा पद्धतीने अण्णा आणि केजरीवाल यांचे आपापल्या मार्गावर स्वतंत्रपणे ‘एकला चलो रे’ धोरण निश्चित झाले.