नवी दिल्ली: तृणमूल कॉंग्रेसने पाठींबा काढून घेतला तरीही सरकारवर परिणाम होणार नाही. लोकसभेत ३२४ सदस्यांचा सरकारला पाठींबा आहे; असा दावा काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी केला आहे.

नवी दिल्ली: तृणमूल कॉंग्रेसने पाठींबा काढून घेतला तरीही सरकारवर परिणाम होणार नाही. लोकसभेत ३२४ सदस्यांचा सरकारला पाठींबा आहे; असा दावा काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी केला आहे.
तृणमूलच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री केंद्र सरकारच्या काही निर्णयांच्या विरोधात असल्या तरीही देश हिताचा विचार करून त्या टोकाचा निर्णय घेणार नाहीत; अशी आशाही सिंह यांनी व्यक्त केली.
तृणमूल काँग्रेसचे लोकसभेत १९ सदस्य आहेत. त्यांनी पाठींबा काढून घेतला तरीही इतर अनेक पक्ष सरकारला पाठींबा देण्यास तयार आहेत. त्यांनी तशी लेखी पत्रही सुपूर्द केली आहेत; असा दावा त्यांनी केला.
केंद्राने पेट्रोलियम उत्पादनांच्या माध्यमातून मिळणार्या करांच्या महसुलापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात अनुदान दिले आहे. राज्य सरकारांनी मात्र मिळणार्या अनुदानातून जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोलियम उत्पादनांवरील करात कधीही घट केली नाही; असे सांगत सिंह यांनी दरवाढीचे खापर राज्यांवर फोडले.
देशाला खरा धोका जातीयवादी पक्षांकडून असल्याने त्यांच्या विरोधात सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येण्याची आवश्यकता सिंह यांनी प्रतिपादन केली.