अमेरिकेतील भारतीय विद्यार्थी संख्या घटली

वॉशिग्टन दि.१६ – सलग दुसर्या् वर्षी अमेरिकेत शिक्षणासाठी जाणार्याब भारतीयांच्या संख्येत घट झाली असल्याचे इंटरनॅशनल एज्युकेशन एक्स्चेंज रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. यंदा सर्वाधिक विद्यार्थी चीनमधून गेले असून ११-१२ या सालात चीनी विद्यार्थ्यांची संख्या २३ टक्कयांनी वाढली असल्याचे या अहवालात म्हटले गेले आहे.

अमेरिकेत शिक्षणासाठी येणार्यार आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यचे प्रमाण यंदा ६ टक्कयांनी वाढले आहे. तसेच अमेरिकेतून अन्य देशांत जाणार्यार विद्यार्थ्यांचे प्रमाणही १ टक्क्याने वाढले आहे. अमेरिकेच्या विविध राज्यात शिक्षणासाठी येणार्या  विद्यार्थ्यांकडून या राज्यांना २२.७ बिलीयन डॉलर्स महसूल मिळत असतो. चीनमधून यंदाच्या वर्षात १,९४,०२९ विद्यार्थी अमेरिकेत आले असताना भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण ३.५ टक्कयांनी घटले आहे. भारतातून यंदा १,००,२७० विद्यार्थी अमेरिकेत गेले आहेत.

अमेरिकेत शिक्षणासाठी जाणार्या  भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण २०००-२००१ सालात ३० टक्कयांनी वाढले होते त्यात ०४-०५ सालात थोडी घट झाली मात्र पुन्हा ०६-०७ सालात हे प्रमाण पुन्हा वाढले होते. ०९-१० या सालात चीनने याबाबतीत भारताला मागे टाकले.  उच्चशिक्षणासाठी परदेशांतून येणारे विद्यार्थी हा अमेरिकेतील टॉपचा सेवा सेक्टर असून त्यात विद्यार्थ्यांचे राहणे, पुस्तके, शुल्क, वाहतूक, आरोग्यसेवा यातून अमेरिकी राज्यांना मोठा महसूल मिळत असतो असेही समजते.