आज बच्चन परिवारासाठी खास दिवस आहे. त्यांच्या घरातील सर्वात छोटी सदस्य असलेल्या आराध्याचा वाढदिवस शुक्रवारी आहे. अमिताभ बच्चन यांच्या नातीला आज एक वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यामुळे बच्चन परिवार हा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करीत आहे. तिचा हा वाढदिवस केवऴ जवळच्या व्यक्तीसमवेत साजरा करण्यात येणार असल्याचे बच्चन परीवराकडून सांगण्यात आले.
अमिताभने नातीच्या वाढदिवसानिमित २४ लाख रुपये किमतीची BMW कार गिफ्ट दिली आहे. यावेळी अमिताभने नात आराध्याला घेऊन तिला २४ लाख रुपये किमतीची मिनी कॉपर BMW ची चावी तिच्या हातात दिली. यावेळी तिला हैप्पी बर्थडे म्हणून सुद्धा विश केले. अमिताभ आणि तिच्या नातीमधील प्रेम जगजाहीर आहे. काही दिवसापूर्वीच अमिताभने ट्विटरवर नातीने मला दादा म्हणून हाक मारल्याने माझे जीवन सफल झाले असे म्हटले होते.
अमिताभचे डोळे आराध्याबाबत चर्चा करताना चमकत असतात. आराध्याच्या जन्मानंतर म्हणजेच सुमारे ११ वर्षानंतर खुशीचे वातावरण आहे. ११ वर्षापूर्वी श्वेता बच्चनने मुलाला जन्म दिला होता त्यावेळी सर्वत्र खुशीचे वातावरण होते. एवढेच नव्हे तर १४ नोव्हेंबर रोजी आराध्याचे मम्मी-पापा म्हणजेच अभि-ऐशने अनाथ आणि गरीब मुलांना अन्नदान केले होते. त्यामुळे बर्थ डे चे सेलिब्रेशन गेल्या काही दिवसापासून सुरु झाले असल्याचे दिसून येत आहे.