मुंबई दि.१८- रिलायन्स इन्फ्रा या अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपमधील कंपनीने सिमेंट मार्केटमध्ये एन्ट्री घेत असल्याचे सोमवारी जाहीर केले असून रिलायन्स सिमेंट या ब्रँडने हे सिमेंट बाजारात दाखल होत आहे. सर्वप्रथम हे सिमेंट विदर्भाच्या बाजारपेठेत उपलब्ध होणार असून नागपूर, वर्धा, च्रंदपूर, भंडारा व अमरावतीत ते मिळणार आहे. त्यानंतर देशाच्या अन्य बाजारपेठेतही हे सिमेंट विक्रीसाठी येणार आहे.
रिलायन्स सिमेंटची बाजारात एन्ट्री
रिलायन्स सिमेंटचे उपाध्यक्ष सुमीत बॅनर्जी अधिक माहिती देताना म्हणाले की आम्ही महाराष्ट्रात प्रथम मार्केटिंग व वितरणाचे मजबूत जाळे विकसित करत आहोत. आम्हाला अल्पावधीतच चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा अनुभव येत आहे. शिवाय भारतीय बाजारपेठेत आता रियल इस्टेट, बांधकाम आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात उर्जितावस्था असतानाच आम्ही बाजारात उतरलो आहोत. भारतीय सिमेंट बाजारात हा ब्रँड क्रांती घडवेल अशी अपेक्षा आहे. नागपूरच्या बुटीबोरी प्रकल्पात त्याचे उत्पादन केले जात असून तांत्रिक दृष्ट्या हे सिमेंट अद्ययावत व सुपिरिअर क्वालिटीचे आहे. या सिमेंटची वैशिष्ठ्ये अशी की अत्यंत कमी वेळात मजबूत बांधकाम या सिमेंटच्या मदतीने करता येणार आहे.
मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात कंपनी दोन प्रकल्प सुरू करत असून त्यासाठी ६ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. १ कोटी पोती निर्मितीची या प्रकल्पांची क्षमता आहे. रिलायन्स इन्फ्रा अभियांत्रिकी, प्रोक्युअरमेंट, बांधकाम क्षेत्रासाठी पॉवर आणि रस्ते बांधणीतून मदतीचा हात पुढे करत आहे. कंपनीकडे सध्या १५,५६० कोटी रूपयांच्या ऑर्डर्स आहेत असेही समजते.
