आमदार निवासात तरुणीची आत्महत्या

मुंबई: मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आमदार निवासात एका आमदाराच्या खोलीत सोमवारी तरुणीचा मृतदेह आढळला. ही तरुणी संबंधित आमदारांच्या स्वीय सचिवाची भाची असून बेरोजगारीला कंटाळून तिने आत्महत्या केली असावी; असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

सोमवारी माढ्याचे आमदार बबन शिंदे यांच्या आमदार निवासातील खोलीत रुपाली अंधारे या तरुणीचा मृतदेह छताला टांगलेल्या अवस्थेत आढळला. रुपाली ही शिंदे यांचे स्वीय सचिव दिलीप धायगुडे यांची भाची आहे. ती आपल्या भावासह आमदार निवासात राहत होती.

रुपाली ही उच्चशिक्षित असूनही नोकरी मिळत नसल्याने नैराश्यग्रस्त अवस्थेत तिने आत्महत्या केली असावी; असा अंदाज कफ परेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन खरात यांनी व्यक्त केला.

Leave a Comment