
कॉम्प्युटरवर सलग बैठे काम करून उद्भवणार्या अंगदुखीवर कॉफी पिणे हा उत्तम उपाय असल्याचा दावा ओस्लो विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केला आहे. सांधे आखडल्यामुळे होणार्या वेदना ग्रहण करणार्या संवेदकांना कॅफिनमुळे उत्तेजना मिळते. त्यामुळे सकाळी एक कप कॉफी पिऊन कार्यालयात गेल्यास कामादरम्यान अंगदुखीचा सामना करावा लागणार नाही, असेही या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
