नवी दिल्ली: गूढरीत्या मरण पावलेली अनुराधा बाली उर्फ फिजा महंमद हिच्या शरीरात विषाचे अंश आढळून आले आहेत. व्हीसेराच्या विश्लेषणानंतर ही बाब समोर आली आहे.

नवी दिल्ली: गूढरीत्या मरण पावलेली अनुराधा बाली उर्फ फिजा महंमद हिच्या शरीरात विषाचे अंश आढळून आले आहेत. व्हीसेराच्या विश्लेषणानंतर ही बाब समोर आली आहे.
अनुराधा उर्फ फिजा ही हरियानाचे माजी मंत्री चंद्रमोहन उर्फ चांद महंमद यांची पत्नी होती. तिच्या घरातच दि. ६ ओगस्ट रोजी तिचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला.
तिचा मृत्यू विषामुळे झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र तिने स्वत: विष प्रश्न करून आत्महत्त्या केली की तिला आणखी कोणी विष पाजले हे अद्याप गूढच आहे.