फ्रान्समध्ये भारतीयांचा ५६५कोटींचा काळा पैसा

नवी दिल्ली: फ्रान्समध्ये भारतीयांचा ५६५ कोटी रुपये एवढा काळा पैसा गुंतविण्यात आल्याची माहिती अर्थ राज्यमंत्री एस. एस. पलानिमणिक्कम यांनी लोकसभेत दिली.

फ्रान्स सरकारने भारत सरकारला त्यांच्या देशात भारतीय नागरिकांनी बेनामी गुंतविलेल्या संपत्तीची माहिती दिली आहे. ही संपत्ती एकूण५६५ कोटी रुपये एवढ्या किंमतीची आहे; अशी माहिती लोकसभेत देण्यात आली. यापैकी काही रकमेवर १८१ रुपये करस्वरूपात वसूल करण्यात आले आहेत. मात्र ही रक्कम परत आणण्याची कोणतीही तरतूद प्रत्यक्ष कर कायद्यात नाही; असेही अर्थ राज्यमंत्र्यांनी सांगितले.