नाशिक: पुण्यातील चिल्लर पार्टीबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पोलिसांना कानपिचक्या दिल्या. जबाबदार लोकांवर कारवाई का केली नाही; असा सवाल करून मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे उप मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढले आहेत.

पुण्यात चिल्लर पार्टी झालेले हॉटेल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चुलत भावाचे आहे. लहान मुलांनी मद्य प्रश्न करणे ही गंभीर बाब असून पालकांनीही याबाबत विचार केला पाहिजे; असे आवाहन चव्हाण यांनी केले. त्याचबरोबर या पार्टीला कारणीभूत असलेल्या जबाबदार लोकांवर कडक कारवाई का केली नाही; असा सवालही त्यांनी केला. सरकार या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत असल्याचेही त्यांनी सांगितले.