वोशिंग्टन: भारताच्या पंतप्रधानांना अमेरिकन माध्यमांनी पुन्हा टीकेचे लक्ष्य केले आहे. ‘भ्रष्ट सरकारचे प्रभावहीन नेतृत्व’ अशा शब्दात वॉशिंगटन पोस्ट या वृत्तपत्राने पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीका केली आहे. केंद्र सरकार या टीकेबद्दल नाराज असून अमेरिकन सरकारपर्यंत ही नाराजी पोहोचविली जाणार आहे.
मनमोहन सिंग हे अत्यंत भ्रष्ट अशा सरकारचे निर्णयक्षमता नसलेले नोकरशहा नेते आहेत; असे या वृत्तपत्राने नमूद केले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबरच मनमोहन सिंग यांचा प्रभावही ढासळू लागला असून त्यामुळे भारताच्या महासत्ता होण्याबाबत शंका व्यक्त केली जात असल्याचे या वृत्तपत्रात नमूद केले आहे.
कोणत्याही बैठकीच्या वेळी सेलफोन ‘सायलेंट मोड’वर ठेवा असे सांगण्याऐवजी ‘मनमोहन मोड’वर ठेवा असे सांगितले जात असल्याचा उल्लेख करून वॉशिंगटन पोस्टने मनमोहन सिंग यांची टर उडविली आहे.
यापूर्वीही अमेरिकेचे टाईम मासिक आणि ब्रिटीश वृत्तपत्र दि इंडिपेंडंटने मनमोहन सिंग यांच्यावर टीका केली होती.