चेन्नई: फटाक्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या तमिळनाडूतील शिवकाशी येथे फटाक्याच्या कारखान्यात स्फोट होऊन ३० जण मृत्युमुखी पडले तर ७० जण जखमी आहेत. कारखान्याच्या परिसरात शेकडो लोक अडकून पडले आहेत.

शिवकाशी येथील शिवशक्ती फटाका कारखान्याला बुधवारी भयानक आगीने वेढले. ही आग एवढी भीषण होती की मदत कार्यासाठी दाखल झालेले अग्निशमन पथक आणि पोलीसही घटनास्थळी पोहोचू शकले नाहीत. मृतांमध्ये बहुसंख्य जण हे कारखान्याजवळून जाणारे लोक होते.
या कारखान्यात सुमारे ३०० कामगार काम करीत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.