भारत चीन दरम्यान लष्करी सहकार्याचा प्रस्ताव

नवी दिल्ली: भारत आणि चीन यांच्यात सहकार्याची वाढ करून दोन्ही देशांचे मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित व्हावे यासाठी उभ्या देशांनी संमती दर्शविली आहे.

भारताचे संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅन्थोनी यांच्या आमंत्रणावरून चीनचे संरक्षणमंत्री जनरल लिएंग गुवानगली हे भारत भेटीवर आले आहेत. या भेटी दरम्यान दोन्ही देशांच्या संरक्षण दलात माहिती आणि तंत्रज्ञानाची देव घेव करणे, विविध क्षेत्रातील मान्यवरांना भेटी देण्यासाठी प्रोत्साहन देणे, सीमा रेषेवर शांतता प्रस्थापित करणे, समुद्रातील शोधकार्य आणि बचावकार्यात परस्पर सहकार्य, आशिया पेसिफिक क्षेत्रात शांतता प्रस्थापित करणे या मुद्द्यांवर भर देण्याचे निश्चित करण्यात आले.

चीनच्या संरक्षण मंत्र्यांनी भारताच्या संरक्षण मंत्र्यांना चीन भेटीचे निमंत्रण दिले असून भेटीची वेळ लवकरंच निश्चित करण्यात येणार आहे.

Leave a Comment