कोळसाकांड प्रकरणी दर्डा बंधू देणार राजीनामा

मुंबई: कोळसाकांड प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने गुन्हे दाखल केलेले काँग्रेस खासदार विजय दर्डा आणि महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांची पाठराखण करणे कॉंग्रेसने टाळले असून दोघांच्या राजीनाम्याची मागणी पक्षाने केली आहे. त्यानुसार हे दोघेही गुरुवारी आपल्या पदांचे राजीनामे सादर करतील; असे कोंग्रेसच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

सीबीआयने धाडी घालून केलेल्या तपासात दर्डा बंधूंशी संबंधित असलेल्या काही कंपन्यांनी खोटी माहिती आणि आकडेवारी देऊन कोळसा खाणींचे परवाने घेतल्याचा आक्षेप आहे. त्यानुसार या कंपन्यांवर फसवणूक आणि गुन्हेगारी स्वरूपाचा कट असे गुन्हे सीबीआयने दाखल केले आहेत. सीबीआयने गुन्हे दाखल केल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्फत दर्डा बंधूंकडे राजीनाम्याची मागणी केली. त्यानुसार हे बंधुद्वय गुरुवारी आपल्या पदांचे राजीनामे सादर करणार आहेत.

Leave a Comment