नवी दिल्ली: राजकीय पक्षांनी घटनात्मक संस्थांवर उघडपणे टीका करणे टाळले पाहिजे; असे आवाहन करीत जनता दलाचे (यु) अध्यक्ष शरद यादव यांनी कॅगवर टीका करणारे काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंग यांना फटकारले.

नवी दिल्ली: राजकीय पक्षांनी घटनात्मक संस्थांवर उघडपणे टीका करणे टाळले पाहिजे; असे आवाहन करीत जनता दलाचे (यु) अध्यक्ष शरद यादव यांनी कॅगवर टीका करणारे काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंग यांना फटकारले.
सिंग यांची कॅगवरील टिपण्णी खेदजनक असून या प्रकारे कॅगच्या अहवालाबाबत कधीही वाद झालेले नाहीत; असे मत यादव यांनी व्यक्त केले. आमचे मित्र चार्टर्ड अकाउण्टण्ट नाहीत. मात्र ते कॅगवर अशा प्रकारे टीका करीत आहेत की; जणू काही ते आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत; अशी उपरोधिक टीकाही यादव यांनी सिंग यांच्यावर केली. संसदेत बोलण्याचा मंत्री आणि सदस्यांना हक्कच आहे. मात्र हे बाहेरही बोलून घटनात्मक संस्थांचे महत्व कमी करीत आहेत; असेही यादव म्हणाले.
कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरणाने संसदेच्या कामकाजात निर्माण झालेला अडसर लवकरच दूर होईल; अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.