सोनिया उपचारासाठी अमेरिकेला रवाना

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाल्याची माहिती पक्षाचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी दिली.

मागील वर्षी सोनिया शस्त्रक्रियेसाठी अमेरिकेला गेल्या होत्या. आता नियमित तपासणीसाठी त्या गेल्याचे द्विवेदी म्हणाले.

अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी सोनियांनी संसदेतील कामकाज ठप्प झाल्याच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांची भेट घेतली. मात्र या भेटीतून काही फलित निघू शकले नाही.