बंगळूरू: भारतात कारवाया करणार्या दहशतवाद्याची भीड अधिकच चेपली असून कर्नाटकातील अणू उर्जा केंद्र आणि देशातील नौसेनेच्या ठाण्यांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केल्याची माहिती कर्नाटक येथून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीतून पुढे आली आहे. पाक गुप्तचर यंत्रणा आयएसआयने त्यांना प्रशिक्षण दिल्याची माहितीही या दहशतवाद्यांनी दिली.
कर्नाटकातून डीआरडीओच्या अभियंत्यासह काही संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून महत्वपूर्ण माहिती मिळविण्यात तपास यंत्रणांना यश आले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड येथून ४ तर हैदराबाद येथून एका दहशतवाद्याला जेरबंद करण्यात आले.
कर्नाटकातील केगा या परमाणू केद्रासह देशातील नौदल ठाण्यांवर दहशतवादी हल्ला करण्याचा या दहशतवाद्यांचा डाव होता. हुजी या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या या दहशतवाद्यांना सौदी अरेबियातून अर्थपुरवठा होत होता; तर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने त्यांना दहशतवादी कृत्यांचे प्रशिक्षण दिले आहे.