लवकरंच हक्कानी नेटवर्कवर बंदी

न्यूयॉर्क: तालिबान दहशतवादी हक्कानी नेटवर्कला दहशतवादी घोषित करून त्यावर बंदी आणण्याबाबत अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन या एक आठवड्यात अमेरिकन संसदेला अहवाल सादर करणार आहेत. हक्कानी नेटवर्कने आतापर्यत भारत आणि अमेरिकेच्या विरोधात दहशतवादी कारवाया केल्या आहेत.

हक्कानी नेटवर्कला दहशतवादी घोषित करून त्यावर बंदी आणल्याने सौदी अरेबियातून त्यांना आर्थिक मदत मिळणे कमी होईल; असा दावा अमेरिकन अधिकार्‍याने केला आहे. अमेरिकेने हे पाऊल उचलल्यावर पाकिस्तानात हक्कानी नेटवर्कवर सैनिकी कारवाई करण्यासाठी दबाव आणता येईल; असेही या अधिकार्‍याने सांगितले.

हक्कानी नेटवर्कला दहशतवादी घोषित केल्यास पाकिस्तान आणि अमेरिकेचे आधीच ताणलेले संबध अधिक बिघडण्याची शक्यताही काही जण व्यक्त करीत आहेत. तसेच तालिबान बरोबर सुरू असलेल्या चर्चेवरही या कारवाईने परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मात्र हिलरी क्लिंटन या कारवाईबाबत आग्रही असून ९ सप्टेंबर रोजी संसदेला आपला अहवाल सदर करतील; अशी माहिती अमेरिकन परराष्ट्र विभागाच्या सूत्रांनी दिली.

Leave a Comment