छोटे नवाब सैफ अली खान त्याच्या होणाऱ्या बेगमसाठी म्हणजेच करीना कपूरला खूष ठेवन्यासाठी नेहमीच काहीही करायला तयार होतो. आतापर्यंत कलाकार मंडळी इंडस्ट्रीजमध्ये मुलगा, मुलगी अथवा बहिणीला प्रमोट करताना पाहवयास मिळतात. मात्र आता सैफवर करीनाच्या आत्येभावाला हिरो करण्याची जबबदारी येऊन पडली आहे.
करीनाची आत्या म्हणजेच रणधीर कपूरची बहिण रिमा हिचा मुलगा अरमान आता २० वर्षाचा झाला आहे. त्याने आता अभिनय क्षेत्रात पाउल ठेवण्याचे ठरविले आहे. बॉलीवूड मध्ये पहिले पाउल ठेवत असताना जादा काळ टीकून राहयचे असेल तर त्यासाठी कोणी तर इंडस्ट्रीजमध्ये गॉडफादर असणे आवश्यक असते. त्यामुळेच करीना आणि सैफने आगामी काळात येत असलेल्या त्यांच्या सिनेमामध्ये अरमानला घ्याचे ठरविले आहे.
सैफ अली खान त्याच्या इंडस्ट्रीजच्या माध्यामातून नवीन प्रोजेक्ट तयार करण्याच्या कामात सध्या बीजी आहे. त्याच्या पुढील प्रोजेक्टमध्ये त्याने हीरो म्हणून आरमनला साइन केले आहे. त्यामुळे सध्या करीना खुपच खूष आहे. अरमानचे स्वप्न सैफच्या होम प्रोडक्शनच्या सिनेमातून पूर्ण होणार आहे. अरमानने यापूर्वी दिग्दर्शक शकुन बत्राच्या ‘एक मै और एक तु’ या सिनेमामध्ये सहायक दिग्दर्शक म्हणून काम पहिले आहे. यापूर्वी बऱ्याचवेळा तो करीना कपूर सोबत सेटवर दिसत होता.