
मुंबई: बॉलीवूडमधील ज्येष्ठ चरित्र अभिनेते आणि स्वातंत्र्यसैनिक ए. के. हंगल यांची रविवारी सांताक्रूझ येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते ९५ वर्षाचे होते.

मुंबई: बॉलीवूडमधील ज्येष्ठ चरित्र अभिनेते आणि स्वातंत्र्यसैनिक ए. के. हंगल यांची रविवारी सांताक्रूझ येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते ९५ वर्षाचे होते.
हंगल यांना दीर्घकाळ क्षयरोग आणि मूत्रपिंडाचा विकार होता. या विकारांमुळे आणि वयपरत्वे त्यांची प्रतिकारशक्ती कमी झाली होती. काही दिवसापूर्वी ते घरातील स्नानगृहात घसरून पडल्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली. त्यांना श्वसनाचा त्रासही होऊ लागला. त्यामुळे त्यांना सांताक्रूझ येथील अशा पारेख रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र उपचारांना त्यांच्या शरीराकडून साथ मिळत नव्हती.
रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली.
विलेपार्ले येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा विजय याने पार्थिवाला अग्नी दिला. पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या हंगल यांनी उतरत्या वयात बॉलिवूडमधे प्रवेश करूनही त्यांची कारकिर्द त्यांच्या अभिनयाच्या उंचीने आणि लांबीनेही मोठी ठरली. हंगल यांनी २०० हूनही अधिक चित्रपटात भूमिका केल्या. मात्र हंगल यांच्या अंत्ययात्रेला अथवा अंत्यसंस्कारांला बॉलिवूड्मधील फारसे कोणी फिरकले नाही.