दंड आकारणीच्या निर्णयाला आव्हान देणार सॅमसंग

सेन जोस:अ‍ॅपलच्या उत्पादनातील काही फीचर्सची नक्कल केल्याबद्दल सॅमसंग कंपनीला सुमारे साडे पाच हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याच्या कॅलिफोर्निया येथील न्यायालच्या निर्णयाला वरच्या न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय सॅमसंगने घेतला आहे.

नऊ न्यायाधीशांचा सहभाग असलेल्या सॅन जोस फेडरल न्यायालयासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सॅमसंगच्या अनेक उत्पादनांमध्ये अ‍ॅपलच्या पेटंटने सुरक्षित केलेल्या सॉफ्टवेअर्स आणि डिझाईनची नक्कल केली गेली आहे; असे न्यायाधीशांनी निकाल देताना म्हटले आहे.

अ‍ॅपलनेच आपल्या पेटंटचे उल्लंघन केले असून त्यांच्यावर दंड आकाराला जावा ही सॅमसंगची मागणी न्यायालयाने फेटाळली. अ‍ॅपलकडूनच ५२ कोटी डॉलर्सचा दंड वसूल करण्याची मागणी सॅमसंगने केली होती.

Leave a Comment