फिरकीची जादू चल गई

हैदराबाद: भारतीय फिरकीची जादू चिन्नास्वामी स्टेडियमच्या खेळपट्टीवर पुन्हा एकदा दिसून आली. किवी फलंदाजांनी भारतीय फिरकी मार्‍यापुढे नांगी टाकली आणि भारताने न्यूझीलेंडवर एक डाव आणि ११५ धावांनी दणदणीत विजय मिळविला. भरताने दोन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

रविवारी पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ सुरू होण्यास उशीर झाला. खेळ सुरू झाल्यावर उमेश यादवने ब्रँडन मॅकम्मलला पायचीत करून किवी संघाला दणका दिला. त्यानंतर आर. अश्विन आणि प्रग्यान ओझा या फिरकी गोलंदाजांनी आपले जाळे पसरले आणि न्यूझीलंडचे फलंदाज त्या जाळ्यात फसत गेले. किवींचा डाव १६४ धावात संपुष्टात आला.

अश्विनने दुसर्‍या डावातही सहा बळी घेऊन सामन्यात १२ बळी घेण्याची ऐतिहासिक कामगिरी नोंदविली. न्यूझीलंडच्या विरुद्ध कोणत्याही फिरकी गोलंदाजांच्या कामगिरीत ही सर्वोत्तम कामगिरी आहे. प्रग्यानने दुसर्‍या डावात ३ बळी घेत अश्विनला मोलाची साथ दिली.

Leave a Comment