’एक था टायगर’ हा सिनेमा सुपरहिट झाल्यामुळे सध्या सलमान सातवे आसमान पर आहे. हा चित्रपट सलमानच्या करिअरमधला सर्वात सुपरहिट सिनेमा ठरला आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवरचे सगळे विक्रम मोडले. ’एक था टायगर’च्या यशामुळे आता सलमानचे भाव वधारले आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निर्माता रमेश तोरानी यांनी सलमानला चक्क शंभर कोटी इतके मानधन देऊन आपल्या आगामी सिनेमासाठी साईन केले आहे. मात्र अद्याप या बातमीवर अधिकृत दुजोरा मिळालेले नाहीये. पण ही बातमी खरी ठरल्यास सलमान बी टाऊनचा सगळ्यात महागडा अभिनेता ठरणार आहे.
भारतीय सिनेमात सर्वाधिक मानधन घेणार्या रजनीकांत यांनाही सलमान खान मागे टाकेल. तोरानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी सलमानची भेट घेतली. ही भेट यशस्वी ठरली. सलमानने रमेश तोराणींच्या सिनेमात काम करण्यात होकार दिला आहे. मात्र जेव्हा सलमानने किती मानधन घेतले हा प्रश्न तोरानींना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले.
लागोपाठ एवढ्या सिनेमांना बॉक्स ऑफिसवर १०० कोटी कमावून दिल्यामुळे सलमान खान बॉक्स ऑफिसचा बादशाह बनला आहे. त्यामुळेच त्याची मागणीही वाढली आहे. आता सलमान खानला एका सिनेमासाठी १०० कोटी रुपयांचीच ऑफर आली आहे. सलमान खानने अजूनही हा चित्रपट साईन केलेला नाही. मात्र लवकरच ही ऑफर सलमान खान स्वीकारेल.