प्लॅस्टिकच्या नोटा लवकरच चलनात

नवी दिल्ली: नोटा खराब होण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता भारत सरकार लवकरच प्लॅस्टिकच्या नोटा चलनात आणणार आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर पाच शहरात १० रुपयांच्या प्लॅस्टिकच्या नोटा वापरात आणल्या जातील.

या नोटांच्या छपाईची निविदा रिझर्व बँकेने मंजूर केली असून पॉलीप्रोप्लिन या प्रकारच्या पॉलीमरपासून या नोटा बनविण्यात येतील. या नोटा खराब झाल्यास त्याचा पुनर्वापरही शक्य होणार आहे.

जयपूर, म्हैसूर, शिमला, भुवनेश्वर आणि कोची या शहरात १०० कोटी रुपये किंमतीच्या १० रुपयांच्या नोटा चलनात आणल्या जाणार आहेत.