ऋषी कपूर ’औरंगजेबा’च्या भूमिकेत

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर त्यांच्या ‘औरंगजेब’ या आगामी चित्रपटात औरंगजेबाची भूमिका साकारणार आहेत यश राज प्रॉडक्शनचा हा चित्रपट आहे. करण जोहर दिग्दर्शित अग्निपथ या चित्रपटात राऊफ लाला नावाची खलनायकाची भूमिका ऋषी कपूर यांची लिलया पेलली होती. ती भूमिका पाहूनच औरंगजेबाची भूमिका कपूर यांना दिल्याचे यश राज प्रॉडक्शनच्या प्रवक्ताने सांगितले.

इशकजादे या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अर्जून कपूरलाही औरंगजेब या चित्रपटात भूमिका मिळाली आहे. अतुल सबरवाल हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून अर्जूनचा यात डबल रोल आहे. अर्जून कपूरसोबत जॅकी श्रॉफ आणि अमरिता सिंगही असणार आहेत. १९७८ सालामधील ‘त्रिशूल’ या चित्रपटाचा रिमेक असल्याचे खंडन यश राजने केले आहे.हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजे २०१३ मध्ये रिलिज होत आहे.

Leave a Comment