तटकरे यांच्या विरोधात भाजपची याचिका

मुंबई: सिंचन घोटाळा प्रकरणी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तटकरे यांच्या डोकेदुखीत त्यामुळे भर पडणार आहे.

धरण आणि सिंचन प्रकल्पांच्या निविदा रकमेत भरमसाठ वाढ करून तटकरे यांनी मोठी माया जमविली आणि बनावट कंपन्या स्थापन करून काळा पैसा व्यवहारात आणण्याचा प्रयत्न केला असे आरोप तटकरेंवर करण्यात आले आहेत.

या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमैय्या आणि प्रवक्ते माधव भंडारी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.