अबू आझमींवर अदखलपात्र गुन्हा

मुंबई: आदिवासी शेतकर्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यावर तलासरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला.

अबू आझमी यांची तलासरी तालुक्यातील दोन गावात सुमारे ७० एकर जमीन आहे. या जमिनीत स्थानिक शेतकर्यांचे अतिक्रमण असून त्या ठिकाणी भातशेती केली जाते. आझमी यांनी बुलडोझर द्वारे या शेतीचा विध्वंस केला आणि आदिवासी शेतकऱ्यांना शिवीगाळ केली; अशी तक्रार स्थानिक शेतकरी करीत आहेत. त्यापैकी जितेंद्र बारक्या डोंगरकर यांनी आझमी यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे.

Leave a Comment