बिझी सोनाक्षी

काही दिवसापूर्वीच अक्षय कुमार सोबतचा ‘रावडी राठोड’ हा चित्रपट हिट झाल्यापासून दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाचे शेड्यूल खूप बिझी झाले आहे. या बिझी शेड्यूलमुळे गेल्या काही दिवसापासून तिला तिचे होमटाउन असलेल्या पटना शहरातदेखील जाता आले नाही.

‘रावडी राठोड’ नंतर तिचा आता अक्षय कुमार सोबतचा ‘जोकर’ हा सिनेमा येत आहे. सध्या ती ‘जोकर’च्या प्रमोशनसाठी सर्वत्र फिरत आहे. ‘जोकर’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार सोबत ती पटना येथे जाणार होती. त्यासाठी तिने काही दिवसापूर्वीच तसे शेड्यूल ही तयार केले होते. मात्र तिला काही कारणामुळे हा दौरा रद्द करावा लागला आहे. यापूर्वी देखील दोन वेळा तिला काही ना काही कारणास्तव पाटण्याची ट्रीप रद्द करावी लागली आहे.

गेल्या काही दिवसापासून ती शत्रुघ्न सिन्हा यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांची सेवा करीत होती. याशिवाय तिला आता ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई-२’ या सिनेमाच्या शूट साठी ओमानला जायचे आहे. या बिझी शेड्यूलमुळे सोनाक्षीला पटना येथे जाण्याची इच्छा असूनही ही ट्रीप रद्द करावी लागत आहे.

Leave a Comment