वॉशिंग्टन: नासाने मंगळाच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी पाठविलेल्या क्युरीओसिटी या अंतराळयानाने मंगळावरील माहिती पाठविण्यास सुरुवात केली आहे.
क्युरिऑसिटीचे काम सुरू
या यानाद्वारे अत्यंत महत्वपूर्ण माहिती मिळत असून त्यामुळे पुढील संशोधनासाठी मोठी मदत होणार असल्याचे मेक्सिकोतील राष्ट्रीय प्रयोगशाळेचे शास्त्रज्ञ रॉजर विन्स यांनी सांगितले.
या अंतराळ यानातील केमकॅम या उपकरणाने मंगळाच्या पृष्ठभागावरील खडकांवर लेझर किरणांचा मारा केला. त्यामुळे खडकातील मूलद्रव्याचा शोध घेणे शक्य होते. या उपकरणाद्वारे स्पेक्ट्रोमीटरवर ६ हजार १४४ वेगवेगळ्या वेव्हलेंग्थ नोण्दविल्या गेल्या असून ही माहिती संशोधनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असल्याचा संशोधकांचा दावा आहे.
